संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या आतंकवाद्याला श्रीनगरमध्ये अटक

0
10

नागपूर दिनांक 10 जानेवारी (शहर प्रतिनिधी)

जहाल दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या सदस्याने नागपुरातील (Nagpur) संघ मुख्यालयासह महत्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी (Police) लगेच तपासाची चक्र फिरवली होती.

ज्या रईस नामक दहशदवाद्याने ही रेकी (टेहळणी) केली होती, त्याला श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. सध्या तो श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. कालांतराने त्याला नागपुरात तपासासाठी आणण्याची कारवाई होऊ शकते, अशी माहिती आज पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली.

रईसने नागपुरातील काही भागात रेकी करण्याचा प्रयत्न केला, पण तेथे पोलिस असल्यामुळे तो या प्रयत्नात यशस्वी झाला नाही, त्याला कुण्याही स्थानिकांनी सहकार्य केले असल्याचे आमच्या तपासात अद्याप निष्पन्न झालेले नाही, असेही ते म्हणाले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि क्राईम ब्रान्चचे एसीपी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अटकेत असलेला रईस नामक दहशतवादी सध्या काश्‍मीर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला येथे स्थानांतरित करण्याची कारवाई यानंतर होऊ शकते, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

रईस नामक दहशतवाद्याला अद्याप नागपूरमधील रेकी प्रकरणात अटक केलेली नाही. शहरातील काही भागांना नो एंट्री आणि नो फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी झोन घोषित करण्यात आलेले आहेत. रईस जेव्हा नागपुरात आला, तेव्हा कुठे थांबला होता किंवा कुणाकुणाला भेटला होता, याचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे, असे अमितेश कुमार म्हणाले.

१३ जुलै रोजी रईसने मुंबईमार्गे नागपूर गाठलं होतं आणि १५ जुलैला त्याने रेकी केली होती. संघ मुख्यालयाबाहेर आत्मघातकी हल्ल्याचा त्यांचा कट होता. यादरम्यान उमर नामक दहशतवाद्याच्या तो संपर्कात होता आणि रईसचा पूर्ण खर्चदेखील उमरने केला असल्याची माहिती आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here