श्रींच्या विसर्जनासाठी फुटाळा मध्ये तयारी पूर्ण

0
10

नागपूर, ता. १६ : नागपूर महानगरपालिके तर्फे यावर्षी शहरातील सर्व तलावात श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. धरमपेठ झोन अंतर्गत फुटाळा तलावात टीनाचे कठडे लावण्यात आले असून मूर्ती विसर्जनासाठी तलावावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. या कामाची पाहणी गुरुवारी (१६ सप्टेंबर) रोजी धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका डॉ. परिणीता फुके, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनी केली.

फुटाळा तलावाच्या परिसरात कृत्रिम विसर्जन कुंड लावण्यात आले आहे. भाविकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे १० मध्यम विसर्जन कुंड तसेच ४ मोठे कुंडची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चटर्जी व सुरभी जायस्वाल आणि त्यांचे सहकारी पर्यावरण पूरक विसर्जनासाठी मनपाला सहकार्य करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here