अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी)ला चार आठवड्यांची फरलो मंजूर

0
10

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चार आठवड्यांची संचित रजा (फरलो) मंजूर केली आहे. गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी संचित रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज खारीज करण्यात आला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेत फौजदारी याचिका दाखल केली.

या प्रकरणी न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मागील सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत गवळीला चार आठवड्यांची संचित रजा मंजूर केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here