राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात’, शंभूराज देसाईंचा राणेंना इशारा

0
12

25 जून रोजी चिपळूणमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर झापताना सीएम बीएम गेला उडत, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे.

नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे. पक्षानं सांगितलं आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितलं तर जशास तसं उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री. राणे यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी नारायण राणेंना इशाराच दिलाय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here