मुख्यमंत्र्यांचा आज रात्री 8.30 वाजता जनतेसोबत संवाद; लॉकडाऊनसंदर्भात निर्णय जाहीर होणार?

0
13

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत. रात्री साडे आठ वाजता ते जनतेला संबोधित करणार असून ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (cm uddhav thackeray live)

राज्यातील करोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली असल्याचं चित्र आहे. मुंबईसह अनेक शहरांत करोनाची संख्या नियंत्रणात येत आहे. मात्र, काही जिल्ह्यात अजूनही रुग्णांची संख्या जैसे थे आहे. राज्यातील एकूण १८ जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. त्यामुळं राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठा आरक्षण, करोना लसीकरण, लॉकडाऊन याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आह

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलं असताना त्या अनुषंगाने मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here