मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या गाण्यांच्या माध्यमातून आपके वेगळे स्थान निर्माण करणारे जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचं नागपूर येथे निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते एका दिर्घ आजारामुळं त्रस्त होते. 21 मे रोजी रात्री 1 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राम लक्ष्मण यांच्या निधनामुळं भारतीय संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
राम लक्ष्मण यांनी तब्बल ९२ चित्रपटात संगीत दिले आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकापेक्षा एक दमदार गाणी दिली. यात ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या चित्रपट आणि त्यातील गाण्याचा समावेश आहे. तसेच त्यांनी राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमांना संगीत दिले आहे. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.
राम लक्ष्मण यांचा जीवनपरीचय…
राम-लक्ष्मण यांचं खरं नाव विजय पाटील असं होतं. ते आपला खास मित्र राम कदम यांच्या मदतीनं संगीतनिर्मितीचं कार्य करत होते. 1976 पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी ‘राम-लक्ष्मण’ ह्या नावानं संगीत द्यायचे. मात्र 1977 मध्ये राम कदम यांचं निधन झालं. परंतु आपल्या मित्राच्या आठवणीत ‘राम-लक्ष्मण’ या नावानच संगीत देणं सुरू ठेवलं. राम-लक्ष्मण यांनी मराठीसह हिंदीतही आपल्या संगीताची वेगळी छाप सोडलेली होती. त्यांनी मराठीत ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘हम से बढकर कौन’ चित्रपटातलं ‘देवा हो देवा गणपती देवा’ या गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. राम-लक्ष्मण यांनी देवानंद, मनमोहन देसाई, महेश भट्ट, दादा कोंडके यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केलं होतं.





