गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेली दुसरी लाट अधिकच तीव्र आणि भयावह आहे. देशातही लाखो लोकांचा कोरोनानं (Corona India) मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आता कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccination drive) उपलब्ध झाली आहे त्यामुळे अनेक लोकं लस घेत आहेत.
या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका कमी होतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र या लस घेण्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्मण झाले आहेत. अशाच एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला देणार आहोत. (Doctors opinion about keeping physical relations after Corona Vaccination)
कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध (Physical relation) ठेवणं योग्य आहे का? तसंच कोरोना लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेऊ शकतो का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आम्ही सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरकडून (Sexologist Doctor Sanjay Deshpande) जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे
कोरोनाकाळात शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का?
डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाकाळात शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. योग्य ती खबरदारी घेतली तर शारीरिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. मात्र या दरम्यान आपल्याला सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोनाची अन्य कुठलीही लक्षणं असतील तर शारीरिक संबंध प्रस्थापित करू नका.
कोरोना लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. मात्र लस घेतल्यानंतर तुम्हाला ताप असल्यास शारीरिक संबंध ठेऊ नका. यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. तसंच योग्य ती काळजी घेऊनच संबंध ठेवा.
डॉक्टरांच्या मते, ज्या दिवशी लस घेतली त्या दिवशीही शारीरिक संबंध ठेवता येतील. यासाठी काळ आणि वेळेचं बंधन नाही. मात्र तुम्हाला कोरोनाशी निगडित कुठलीही लक्षणं असतील तर एकमेकांच्या जवळ येऊ नका.






