धक्कादायक !म्युकोरमायकोसिसचा महाराष्ट्रात पहिला बळी

0
8

म्युकोरमायकोसिस (mucormycosis) या आजाराने आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिरकाव केला आहे म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. राज्यात म्युकोरमायकोसिसमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.

मृत व्यक्तीचे नाव बाजीराव काटकर असून ते 69 वर्षांचे होते. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या सात रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे समजते. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात अधिकृतरित्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाजीराव काटकर यांचा मृत्यू झाल्याची बाब डॉक्टरांनी खासगीत मान्य केली आहेे

म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here