नागपूर दिनांक 10 ऑगस्ट ( शहर प्रतिनिधी)
“स्वतंत्रता दिनानिमित्त” शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत सोमवार दिनांक 15 ऑगस्ट, 2022 ला “स्वातंत्र्य दिनानिमित्त” नागपूर महानगरपालिा हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.
या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.






