नागपुरात सतर्कतेचा इशारा

0
8

नागपूर दिनांक 10 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)

नवेगाव खैरी धरणाचे १६ ही दरवाजे २ मीटरने उघडण्यात आलेले असून त्यामधून जवळपास ३००० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच नागपूर जिल्हयात संततधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान खात्याने Orange Alert जारी केलेला आहे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले असून नदी व नाले दुथडी वाहत आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक काळजी व खबरदारी बागळण्याचे आवाहन करण्यात आले आहे

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर

०७१२-२५६२६६८

टोल फ्री क्र १०७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here