हिंगणा दिनांक 8 ऑगस्ट ( प्रतिनिधी)
मारवाडी समाजातील 10वी आणि 12वी मध्ये गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मारवाडी युवा मंच शाखा नागपूर तर्फे सत्कार करण्यात आला.
माहेश्वरी भवन बर्डी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात 10वी व 12 वी तील 60 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथील तहसीलदार श्रीराम मुंदडा, मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग, एम आय क्लबचे सचिव विनोद चतुर्वेदी, संजय पालीवाल,मारवाडी युवा मंच नागपूर शाखेचे अध्यक्ष कन्हैया मंत्री, सचिव हेमंत शर्मा आधी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रकल्प संचालक हरिष राठी यांनी केले. तर आनंद राठी यांच्याकडून विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष कन्हैया मंत्री यांनी केले. सूत्रसंचालन हरिष राठी तर आभार सचिव हेमंत शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता किशोर पालीवाल, राज चांडक, प्रतीक बागडी,हिमांशू चांडक व मारवाडी युवा मंच नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.






