14 जुलै रोजी धापेवाडा येथील दारुची दुकाने बंद

0
16

सावनेर नागपूर दिनांक 8 जुलै ( प्रतिनिधी)

सावनेर तालुक्यातील धापेवाडा येथील विठ्ठल मंदिर परिसरात आषाढी पोर्णिमेनिमित्त 9 ते 14 जुलै या कालावधीत होणाऱ्या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे दृष्टीकोनातून धापेवाडा ग्रामपंचायत व दोन किलोमिटर परिसरातील सर्व देशी व विदेशी दारु विक्रीच्या अनुज्ञप्त्या 14 जुलै रोजी बंद ठेवण्याची आदेश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत.

या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानुसार सक्तीची कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here