महाराष्ट्र दिनांक 6 जुलाई ( प्रतिनिधी)
Amruta Fadnavis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीस यांनी माहिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. असा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी दिलेल्यामुलाखतीत केला आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील सभागृहातील एका भाषणात सरकार स्थापनेसंदर्भात अनेक गुपित गोष्टींचा उलगडा केला होता. शिंदे म्हणाले होते की, सत्तांतर काही एका दिवसात झालं नाही, मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो. असंही शिंदे म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीसबाबत गर्व
मुलाखतीत त्या म्हणाल्या, मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाही, याबाबत मला गर्व वाटत होता. की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले, तसेच मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही फरक पडणार नव्हता. असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.






