नागपूर दिनांक 8 जून (शहर प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल आज बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर झाला आहे.
यावेळी नागपूर विभागाने बाजी मारली असून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागानंतर नागपूर विभागाचा निकाल हा ९६.५२ टक्के लागला आहे.
नागपूर विभागातून एक लाख ६० हजार २८ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील एक लाख ५९ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यातील १ लाख ५३ हजार ५८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९६.५२ टक्के इतकी आहे.






