उद्या पासून मेट्रो ट्रेन वेळापत्रकात बदल

0
16

नागपूर दिनांक 5 जून ( शहर प्रतिनिधी)

नागपूर मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची गरज लक्षात घेत याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. हे बदल उद्या ६ जून (सोमवार) पासून लागू होतील. या अंतर्गत खापरी, लोकमान्य नगर, कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी इंटरचेंज येथून सुटणाऱ्या गाड्यांना हे बदल लागू होतील.

उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकाप्रमाणे प्रवाश्यांची अतिशय गर्दीची वेळ बघता त्या वेळेवर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. उन्हाळ्यामुळे आणि गेले काही दिवस वाढलेल्या उकाड्याने प्रवासी तापमान कमी झाले की बाहेर पडतात आणि मेट्रोने प्रवास करतात हे निदर्शनास आले आहे. म्हणूनच सायंकाळी ५ ते ७ वाजे पर्यंत प्रवासी संख्या जास्त असल्याने या याकाळात १५ ऐवजी दर १२ मिनिटांनी मेट्रो सेवा असेल. सर्वसाधारणपणे हि वेळ कार्यालयातून परत येण्याची असल्याने देखील या दरम्यान गाड्यांमध्ये गर्दी जास्त असते.

तसेच सकाळी ८ ते १०.३०, दुपारी ३.३० ते ५ आणि सायंकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान मेट्रो सेवा दर १५ मिनिटांनी असेल. या खेरीज इतर वेळेवर सुटणाऱ्या प्रत्येक मेट्रो गाडीमध्ये २० मिनिटाचे अंतर असेल. या आधी दिलेल्या माहिती प्रमाणे सकाळी ६.३० वाजता पहिली तर रात्रौ १० वाजता शेवटची मेट्रो फेरी वरती उल्लेखित केलेल्या चारही मेट्रो स्टेशन वरून असेल.

मेट्रोने प्रवास करताना उद्या पासून लागू होणाऱ्या वेळापत्रकाची माहिती प्रवाश्यांनी ठेवावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here