हिंगणा दिनांक 22 मई ( प्रतिनिधी)
नागपूर येथे सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात हिंगणा येथील स्व. देवकीबाई बंग विद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी सहभाग घेऊ चमकदार कामगिरी केली
खासदार क्रीडा मोहत्सवात खेळल्या जाणाऱ्या अनेक मैदानी क्रीडा प्रकारात विद्यालयाच्या अनुष्का कांबळे या विद्यार्थिनीने हाई जंप मध्ये सुवर्ण पदक, लाँग जंप मध्ये रौप्य पदक तर 400 मीटर रिले मधे कास्य पदक मिळविले.
साची मेंढे या विद्यार्थिनीने 100 मीटर मध्ये कास्य , 300 मीटर मध्ये रौप्य, 100 मी. रिले मधे रौप्य तर मिडले रिले मधे रौप्य पदक प्राप्त केले.
रोहिणी दुरबुडे या विध्यार्थिनीने शाॅटपुट मध्ये रौप्य पदक , उज्वल देव नी 50 मी रिले मध्ये कास्य व प्रतीक राऊत अंडर 16 मॅराथाॅन मध्ये विजेता ठरला.
सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग, संस्थेचे संचालक महेश बंग, संस्थेच्या संचालिका अरूणा बंग व शाळेचे प्राचार्य नितीन तूपेकर यांनी कौतुक केले
विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा प्रशिक्षक राहुल काळबांडे व राहुल पुडके व आपल्या आई वडिलांना दिले.






