कोलवॉशरीज मध्ये बावनकुळे यांचे कमिशन: प्रशांत पवार यांचा आरोप

0
12

नागपूर दिनांक 23 एप्रिल ( महानगर प्रतिनिधी)

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कोल वॉशरीज मध्ये कट असल्याचा खळबळजनक आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे

बावनकुळे यांचा सहभाग नसल्यास त्यांनी कोल वॉशरीज बद्दल स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही पवार यांनी केली

महाराष्ट्र राज्यातील विजेचे लोडशेडींग कोळसा निर्मीती व कोळसा आयात कमी झाल्यामुळे करण्यात येत असल्याचे शासनाकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे. काही प्रमाणात सदर स्पष्टीकरण खरे असले तरी मुख्य कारण कोल वॉशरीजला पुरविण्यात येणारा कोळसा, कोलवॉशरीनी वेस्ट कोलच्या नावावर खूला बाजारात विकण्यात येणारा कोळसा व केन्द्रसरकारचे प्रायव्हेट पार्टीला कोल ब्लॉक देण्याचे धोरण आहे.

विजेची टंचाई ही शासन निर्मीत असून याचा फटका जनसामान्य व्यक्तींना होत आहे. औद्योगिक कारखाने व इतर व्यावसायीक गतीविधींना ठप्प करून कोळसाच्या माध्यमातून अब्जो रुपयांची लूट राज्यसरकार व केन्द्र सरकार करीत आहे. मंत्री

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी १४ हजार मेगावॉटची तूट असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले आहे. मागील दोन वर्षापासून बरेचशे औद्योगिक कारखाने बंद होते. त्यामुळे कोळसा निर्मीती झाल्यानंतर सदर कोळसा विज निर्माण कंपनी यांनी घेवून त्याचे नियोजन करणे आवश्यक होते. तथापी विज निर्मीतीसाठी विकत घेतलेला कोळसा, पावर प्लॉन्ट मध्ये न पोहचता, कोल वॉशरीज मध्ये पोहचत असून त्यापैकी सुमारे १५ टक्के कौळसा वेस्ट कोल म्हणून खूला बाजारात विकण्यात येत आहे.

२२ दशलक्ष मेट्रीक टन कोळसा वार्षीक खरेदी करण्यात येत असून ३३ दशलक्ष कोळसा वेस्ट म्हणून विकण्यात येत आहे. हा कोळसा जर महाजनको साठी वापरण्यात आला असता तर महाराष्ट्रामध्ये लोडशेडींगचा प्रश्नच उभा झाला नसता असेही प्रशांत पवार यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here