राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा, सामूहिक हनुमान चालीसाचे पठण होणार

0
12

महाराष्ट्र दिनांक 16 एप्रिल ( प्रतिनिधी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) हनुमान जयंतीनिमित्त येत्या शनिवारी (१६ एप्रिल) पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुण्यात महाआरती व सामुहिक हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण आयोजिण्यात आले आहे.

कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली. ठाण्यातील उत्तर सभेत मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला ३ मे चा अल्टिमेटम दिल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असेल.

खालकर तालीम चौकातील मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी १६ एप्रिल रोजी सांध्यकाळी ६.०० वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.

गेले दीड शतक खालकर मारुती मंदिर हे भविकांचे श्रद्धा स्थान राहिले आहे. हे मंदिर जुने झाल्यामुळे आणि एका अपघातात मंदिराची भिंत पडल्यानंतर २० वर्षांपूर्वी मंदिराच्या बांधकामाची सुरुवात राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. मंदिरात नित्यनियमाने पूजाअर्च्या होमहावन धार्मिक विधी होत असतात.

शनिवारी १६ एप्रिलला हनुमान जयंतीचा कार्यक्रम दिवसभर चालणार असून रविवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ११ या वेळात होणाऱ्या महाप्रसाद असणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस आणि हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरती आणि सामूहिक हनुमाना चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजक अजय शिंदे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here