निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी शालीनीताई मेघे हॉस्पिटल मध्ये नि:शुल्क सेवा

0
16

नागपूर दिनांक 31 मार्च ( शहर प्रतिनिधी)

उच्च न्यायालय, मुंबई यांच्याद्वारे मंजूर केलेल्या योजनेप्रमाणे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयांतर्गत दत्ता मेघे इन्स्टिटयुट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च नागपूर या सार्वजनिक न्यासाद्वारे संचालित शालीनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वाय.सी.सी.ई कॅम्पस, वानाडोंगरी,हिंगणा, नागपूर रुग्णालयाचा सार्वजनिक धर्मादाय रुग्णालयात समावेश करण्यात आला आहे.

या धर्मादाय रुग्णालयात निर्धन घटकातील रुग्ण ज्यांचे वार्षिक उत्पन्न 85 हजार व दुर्बल घटकातील रुग्ण ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजाराच्या आत आहे. त्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे व तहसिलदार यांचेद्वारे निर्गमित उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, दारिद्रय रेषेखालील पत्रिका अनुक्रमे मोफत व सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे, गरजूंनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणीच्या धर्मादाय सहआयुक्त आभा कोल्हे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here