महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धुळफेक : देवेंद्र फडणवीस

0
9

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी व कडक निर्बंध जाहीर करताना विविध घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धुळफेक आहे. याचं कारण म्हणजे ३३०० कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली ते नियमित बजेटमधील तरतूद आहे. जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळं सध्या वाढणाऱ्या करोनासाठी ही तरतूद नाही,’ अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

‘सरकारने फेरीवाल्यांना मदत करु असं सांगितलं आहे. नोंदणीकृत असा उल्लेख केल्याने याचा उपयोग फक्त मुंबई आणि ठाण्यापुरता होणार आहे. याशिवाय रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना परवानगी दिली आहे. संचारबंदी लावल्याने त्यांच्याकडे येणार कोण? पार्सल देण्याची त्यांच्याकडे काय व्यवस्था आहे. असती तर त्यांनी हॉटेलच उघडलं असतं,’ अशा शब्दांत सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर त्यांनी टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here