नितीन गडकरींच्या घरासमोर काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडले,मोठा तणाव…

0
7

नागपुर दिनांक 10 फेब्रुवारी (महानगर प्रतिनिधी)

नागपूरात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळत आहे. नागपूरात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण आला आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानासमोर निषेध आंदोलन सुरू केलं आहे. त्याचवेळी भाजपचे कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात नितीन गडकरींच्या घरासमोर जमा झाले आहेत. त्यामुळं तणाव वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोनासंबंधी वक्तव्याविरोधात काँग्रेसने राज्यात अनेक ठिकाणी भाजपविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले. मोदी आणि भाजपने यावर जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आज नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन केले. मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

 

एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपविरोधात आक्रमक झाले असतानाच भाजपचे कार्यकर्तेदेखील झेंडे घेऊन आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, पंतप्रधान मोदी जिंदाबाद अशी घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांनी केली. तसंच, भाजपाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तर, नितीन गडकरी यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here