यावर्षी 26 जानेवारीला सीताबर्डी किल्ला बंद

0
12

नागपूर दि.22  जानेवारी (प्रतिनिधी)

दरवर्षी 26 जानेवारीला आम जनतेसाठी खुला असणारा सीताबर्डी किल्ला यावर्षी खुला राहणार नाही. वर्षातील मोजकेच दिवस स्थानिक नागरिकांसाठी खुला राहणारा सीताबर्डी किल्ला कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 जानेवारी व 15 ऑगस्टला स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व तरुणांच्या गर्दीत फुलणारे हे प्रेक्षणीय स्थळ 26 जानेवारीला बंद राहील.

सैन्याच्या अखत्यारीत असलेल्या सीताबर्डी किल्ल्याला दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीला खुला करण्याची परवानगी सैन्याने प्रशासनास मागितली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सध्या अंमलात असलेले निर्बंध तसेच पोलीस विभागाकडून प्राप्त अहवालास ग्राह्य धरून निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी ती परवानगी नाकारली आहे.

साथीचा पायबंद करण्यात अपेक्षित यश आले आणि परिस्थिती अनुकूल झाली तर यापुढे येत्या 15 ऑगस्टला नागरिकांना किल्ल्यास भेट देता येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here