कुही नागपूर दिनांक 20 जनवरी (प्रतिनिधि)
पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत आज सकाळी 11.30 वाजता दरम्यान मौजा कुजबा येथील 5 महिला कपास वेचण्याकरिता आम नदीच्या पलीकडील शेतमालक नामे परमानंद तिजारे रा. टाकली यांच्या शेतामध्ये त्यांच्याच डोंग्याने जात असता आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा फुटल्याने डोंगयामध्ये पाणी भारत असता, डोंग मध्ये बसलेल्या महिला घाबरल्याने डोंगा पलटी झाले.
त्यामध्ये नाव सौ गीता रामदास निंबारते ही मरण पावली व बाकीचे नामे मनू सुरेश साळवे , मनीषा राजू ठवकर, लक्षमी लोमेश्वर गिरी , मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे उपचार घेत असून, त्यापैकी नामे लक्षमी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांना प्राथमिक उपचार करून मेडिकल कॉलेज येथे रेफर करण्यात आले.






