सहकार आघाडीस काम करण्यास भरपूर वाव” – प्रा. अनिल सोले

0
13

नागपूर दिनांक 2 जनवरी (महानगर प्रतिनिधि)

सहकार क्षेत्र हे अत्यंत विस्तृत आहे नागपुरात अनेक लहांन मोठ्या सहकारी पत संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था अस्तित्वात आहेत त्या चालविणारे संचालक तसेच त्यातील कर्मचारी आहेत. त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्या समस्यां जाणून घेऊन त्या सोडवीण्याचा प्रयत्न करा, भाजपा सहकार आघाड़ी ला काम करण्यास भरपूर वाव आहे. असे प्रतिपादन माजी आमदार आणि शक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा अनिल सोले यांनी केले ते भाजपा सहकार आघाडीतर्फे आयोजित कार्यकर्ता स्नेहमीलन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते,

हनुमाननगर झोन सभापती सौ कल्पनाताई कुंभलकर, फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, भाजपा शहर संपर्क प्रमुख भोलानाथ सहारे, शिक्षक परिषदेचे योगेश बन, सहकार आघाडी माजी अध्यक्ष विजय फडणवीस, विद्यमान अध्यक्ष किशोर भागडे मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे अनिल सोले म्हणालेत की, “प्रत्येक वार्ड मधील अश्या संस्था व त्यांच्या संचालकांची यादी तयार करून त्याना भेटा व आपल्या आघाड़ी बरोबर जोड़ा. सहकार क्षेत्रात आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवा . आज भाजपा सहकार आघाडीने चांगला पाया उभा केला आहे आता अधिक विस्तार करणे आवश्यक आहे. पक्षाने जे काम दिले ते महत्वाचे समजून ज़िद्दीने करा जेणेकरून इतर लोकही तुमचे अनुकरण करतील. आज दक्षिण नागपुर सहकार आघाड़ी अध्यक्ष श्री विश्वनाथ कुंभलकर यांचा वाढदिवसही आहे त्यांच्या नेतृत्वात दक्षिण नागपुर सहकार आघाड़ी उत्तरोत्तर प्रगती करेल असा विश्वास व्यक्त करूया आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया!”

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे म्हणाले की ”सहकार क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्याने कुठलेही काम करताना स्वतःला निःस्वार्थपणे त्या कार्यात झोकून द्यावे त्यासाठी कार्यव्याप बघून त्याच सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करण महत्वाच आहे,”

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन नियोजन व्यवस्थापन केल्याबद्दल समितीचे अध्यक्ष आजचे प्रमुख वक्ते प्रा अनिल सोले यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला, भोलानाथ सहारे यांनी आपले विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे संचालन सहकार आघाडी महानगर महामंत्री अनिल देव यांनी केले तर आभार स आ दक्षिण मंडळ महामंत्री अधिवक्ता दीपाली ढोमणे यांनी मानले

कार्यक्रमाला सहकार आघाडी पदाधिकारी मधुकर पाठक, श्रीधर चौहान, विश्वनाथ कुंभलकर, किरण रोकडे, दीपाली अवचट, नंदेश सावरकर, चेतना सातपुते, निलेश रेवसकर, मंगलदीप ताजने, तसेच माजी नगरसेवक राजू नागुलवार, रामभाऊ कुंभलकर, परशु ठाकूर तसेच

स्वच्छ भारत अभियानचे पदाधिकारी अनिल झोडे, सौ प्राणिता लोखंडे, सौ भाग्यलता तलखंडे, सौ चित्रा माकडे,उपेंद्र वालदे,  मनोज भालेराव, हेमंत सावरकर, सौ ममता डांगे, रामचंद्र राऊत, राजा भांदक्कर, श्रीकांत क्षीरसागर, दिलीप तुरणकर, सचिन चंदनखेडे, भूषण शेरेकर, प्रणय भालेराव, तसेच वैशाली हनोते, मृणाल यादव, सोळंकी, रजत भागडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here