आशियातील सर्वात मोठे माती आधारित हाय-टेक व्हर्टिकल फार्मिंग आणि पॉली हाऊसमध्ये बायो-फ्लॉक ऍक्वा कल्चर फार्मिंग
• ऑटोमेशन आधारित व्हर्टिकल फार्मिंग प्रकल्प देतो दुप्पटपेक्षा जास्त उत्पन्न
• गीतगंगा फार्म्सने कमी जागेत फायदेशीर शेतीचा उभारला प्रकल्प
• इच्छुक शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
नागपूर, 23 डिसेंबर (महानगर प्रतिनिधि)
उद्योगपतींनी शेतीला अधिक समृद्ध करण्यासाठी शेतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये आपल्या भाषणात केले होते. यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कृषी क्षेत्रासाठीचे व्यापक कार्य आणि प्रयत्नांपासून प्रेरणा घेत गीतगंगा फार्मचे संस्थापक हिरेन पटेल यांनी नागपूर जिल्ह्यातील मनसर, रामटेक येथील पॉली हाऊसमध्ये मातीवर आधारित आशियातील सर्वात मोठी हाय-टेक व्हर्टिकल फार्मिंग आणि बायो-फ्लॉक ऍक्वा कल्चर फार्मिंगची सुरुवात केली.
उद्योगपती असलेले आधुनिक शेतकरी हिरेन पटेल यांनी २३ डिसेंबर २०२१ रोजी त्यांच्या उच्च तंत्रज्ञान शेती प्रकल्पाविषयी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले, गीतगंगा द्वारे पाच वर्षापूर्वी एक कृषी उद्योग सुरू करण्यात आला होता, ज्यामध्ये आम्ही १ एकरमधून १०० एकर उत्पादन घेतो. हा आशियातील सर्वात मोठा आणि सर्वात मोठा प्रकल्प आहे. आम्ही ११० एकरमध्ये जवळपास २३०० एकर शेती करतो. हळद, बीटरूट, ब्रोकोली यासारखी इतर विविध उत्पादने यातून घेतली जात आहेत जी रोगप्रतिकारक शक्तीच्या दृष्टिकोनातून आघाडीचे उत्पादन आहेत. जास्तीत जास्त देशांमध्ये निर्यात केली जातात, अशी माहिती पटेल यांनी दिली. या प्रकल्पास एएस ऍग्री आणि ऍक्वा एलएलपीचे डॉ. प्रशांत झाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आमच्याकडील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून १ एकरमधून १०० एकरचे उत्पादन घेता येते. हे तंत्रज्ञान हवामान परिस्थितीवर अवलंबून नाही. यात पाण्याचा अतिशय कमी वापर केला जातो. हा संपूर्ण सानुकूलित शेतीचा एक भाग आहे. महत्त्वाचे म्हणजे माती, हवामान, मनुष्यबळावरील अवलंबित्व दूर केले जाते. तसेच, शेतीच्या या तंत्राचे इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा गुरू नानक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे सुरू करण्यात येणार आहे. स्मार्ट व्हर्टिकल फार्मिंगसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाचा यात समावेश केला जाईल, असे ते म्हणाले.
उद्योगपतींना जर कृषी व्यवसायात यायचे असेल तर ते येऊ शकतात. याशिवाय, शेतक-यांना रोजगार देण्याचाही आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही युवा फाउंडेशनमार्फत प्लेसमेंट सेल सुरू केला आहे. नजिकच्या भविष्यात उद्योगपतींना शेतीकडे आणण्याचा आमचा अजेंडा आहे, असे पटेल म्हणाले.
आमचा प्रकल्प पाहून अनेकांना प्रेरणा मिळेल, शिवाय, निर्यातीचा मार्गही मोकळा होईल. याशिवाय, गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट, लॉजिस्टिक इत्यादी अनेक गोष्टींचा यात समावेश राहणार आहे.
आशियातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून आम्ही हा प्रकल्प औद्योगिक प्लांट मॉडेल म्हणून विकसित केला आहे. हा प्रकल्प इतका आधुनिक आणि सोयीस्कर आहे की तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा वाहनाद्वारे ते हलवू शकता. येथे गोदामासारखे सर्व सहयोगी उद्योग ऑटोमेशनवर आहेत. आम्ही व्हर्टिकल फार्मिंग करत असल्यामुळे किड, बुरशी इत्यादींचे आव्हान राहणार नाही. आम्ही शेतमालापासून दर्जेदार मूल्यवर्धित उत्पादने निर्यात करतो. भारतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी मूल्ये असलेली समृद्ध कृषी उत्पादने आहेत आणि जगभरात त्यांची मागणी प्रचंड आहे. त्याची निर्यात अर्थव्यवस्थेला उंचावण्यासाठी हातभार लावू शकते. हे व्हर्टिकल फार्मिंग जमिनीचा -हास होण्यापासून वाचवते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. सोबतच, भारताला शेतीमध्ये अग्रणी होण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते.
संचालकांबद्दल माहिती –
हिरेन पटेल हे गीत गंगा फार्म्सचे संस्थापक असून, डॉ. प्रशांत झाडे हे एएस ऍग्री आणि ऍक्वा एलएलपीचे अध्यक्ष आहेत तर, डॉ. साईनाथ हाडोळे हे एएस ऍग्री आणि ऍक्वा एलएलपीचे तांत्रिक संचालक आहेत. याव्यतिरिक्त मनसुखलाल पटेल,तिरुमला राव गोर्ला,महावीर मालू,हेतल तन्ना,अमित लाहोटी,हेमांग तन्ना,नारायण सुराणी,मनीष पटेल,योगेश पटेल,भावेश पटेल हे गीत गंगा फार्म्सचे संचालक आहेत.
——–
ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते 26 रोजी उद्घाटन
गीतगंगा फार्मस आणि एएस अॅग्री अँड अक्वा एलएलपी यांच्या संयुक्त विद्मयाने आशिया खंडातील सर्वात मोठे हायटेक सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंग अँड बायो-फ्लोक अॅक्वाकल्चर फार्मिंग प्रकल्पाचा शुभारंग रविवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होत आहे. गीतगंगा फार्म मनसर येथे वसलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला खा. कृपाल तुमाने, खा. रामदास तडस, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, नवनिर्वाचित आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, आ. परिणय फुके, आ. अभिजित वंजारी, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, कॉंग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते दुनेश्वर पेठे, सुरेश वाघमारे, माजी आमदार सागर मेघे, सईद मुझफ्फर हुसेन, राहूल माकणीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
सेंद्रीय फुला-फळांची माला
सेंद्रीय शेती आणि शेतक-यांच्या सन्मानार्थ शेतीत उत्पादित होणा-या सेंद्रीय भाज्या, फळे, कंद, मुळे इत्यादींचा समावेश असलेला 50 फुट लांबीची माला तयार करण्यात आली आहे. ही माला उद्घाटनाच्या दिवशी प्रदर्शित केली जाणार आहे. सेंद्रीय उत्पादनांपासून तयार झालेली ही देशातील पहिली माला असेल. ही माला तयार करण्यासाठी सुमारे दीड महिन्याचा कालावधी लागला आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर या मालेतील फळे, भाज्या इत्यादी गावक-यांना वितरीत करण्यात येणार आहेत.






