पश्चिम विदर्भ दिनांक 15 दिसंबर (प्रतिनिधि)
राज्यात ओमिक्रॉन बाधित (Omicron) रुग्णांची संख्या वाढत चालली. आज राज्यात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. दुबईवरून बुलडाण्यात आलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीना करोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात पहिला ओमिक्रॉनच्या रुग्णाची नोंद झाली आहे. (omicron variant cases in maharashtra)
दुसरी लाट ओसरत असतानाच आता ओमिक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूमुळे जगभराची चिंता वाढली. विदेशातून येणाऱ्या लोकांमध्ये ओमिक्रॉनचे विषाणू आढळून आल्याने विदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची करोना चाचणी केली जात आहे. तसेच त्यांच्यावर लक्ष सुद्धा ठेवलं जातं आहे. तसंच, राज्यय सरकारकडून अतिजोखमीच्या देशातून आलेल्या नागरिकांची आरटी- पीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. मुंबई, पुणेबरोबरच आता विदर्भातही ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. मात्र, त्याबरोबरच एक दिलासादायक माहितीही समोर आली आहे.
गेल्या ९ डिसेंबर रोजी दुबईवरून आलेल्या व्यक्तीला करोनाचे निदान झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या रुग्णाला ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालाय का यासाठी त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे पाठविण्यात आला होता. चार दिवसानंतर हा रिपोर्ट आज प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह आला आहे. त्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागानं म्हटलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे संबंधीत व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा अहवाल करोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.






