वाशिम दिनांक 7 डिसेंबर (विशेष प्रतिनिधी)
अकोला, बुलडाणा, वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चुरस वाढत असून अकोला, बुलढाणा, वाशीम विधानपरिषदेच्या निवडणूक रिंगणात भाजपातर्फे वसंत मदनलाल खंडेलवाल यांनी नामांकन दाखल केले आहे तर त्यांच्यासमोर तीनदा ही निवडणूक जिंकलेले शिवसेनेचे गोपीकिसन बाजोरिया आहेत
यावेळी ही निवडणूक दोन्ही उमेदवारांच्या प्रतिष्ठेची आहे. गेल्या १८ वर्षापासून महाविकास आघाडीचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया हे आमदार असून यावेळी भाजप आणि शिवसेनेची युवती नसल्याने दोन चागले मित्र आणि शेजारी हे एकमेकांच्या विरोधात उभे असून वसंत खंडेलवाल हे एक सराफाचे व्यापारी सुरवातीपासून भाजपसी जुडले आहेत. नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने ही निवडणूक ठाकरे विरुद्ध गडकरी अशीच चर्चा सर्व दूर आहे. तर दोन्ही उमेदवार एकमेकांवर ताशेरे ओढायला कुठलीच कसर सोडत नाहीत.
निवडणूक आता चुरशीची होणार असून यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






