रामटेक येथील गांधी चौकातील विमल ज्वेलर्सचे मालक श्याम बालचंद बादुले सकाळी दुकान उघडायला गेले असता दुकानाचे कुलूप उघडताना त्यांनी बाजूला ठेवलेली सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी आणि सोन्याचे कव्हरिंग असलेले दागिन्यांनी भरलेली बॅग काही सेकंदातच त्यांना दिसेनाशी झाली.
त्यांनी आजू बाजूला विचारपूस केली असता त्यांच्याकडून मला माहित नाही, असे उत्तर मिळाले. अज्ञात चोराने त्यांची बॅग लंपास केल्याचा त्यांना संशय आला. बॅगमध्ये एकूण ४ लाख ७६ हजार किंमतीचा मुद्देमाल असल्याचे श्याम बादुले यांनी सांगितले.
पोलिसांनी चारही दिशांना आपल्या परीने अज्ञात चोराला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोराचा शोध लागला नाही.रामटेक पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.






