पथ विक्रेत्यांच्या विविध योजनां संदर्भात 4 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान विशेष शिबिर

0
19

केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (PM SVANidhi) अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पथ विक्रेत्यांना कोव्हिड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने टाळेबंदी (Lockdown) काळात झालेल्या नुकसानामुळे पुनश्चः व्यवसाय करण्याकरिता रु. १०,०००/- भांडवल कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ज्या पथ विक्रेत्यांना रु. १०,०००/- कर्ज बँकेमार्फत वितरीत करण्यात आले आहे, अशा पथ विक्रेत्यांकरिता सदर योजनेशी संलग्नित करण्याकरिता केंद्रशासनामार्फत स्वनिधी ते समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत वित्तीय विभागामार्फत 1) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, 2) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, 3) प्रधानमंत्री जन धन योजना आणि Issuance of RuPay Card, कामगार विभागामार्फत 1) बांधकाम मजूर नोंदणी प्रक्रिया (Registration under BoCW), 2) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अन्न व पुरवठाविभागामार्फत 1) एक देश एक राशन कार्ड (One Nation One Ration Card), आरोग्य व परिवार कल्याणविभागामार्फत 1)जननी सुरक्षा योजना, महिला व बाल विकास विभागामार्फत 1)प्रधानमंत्री मातृवंदना योजना ई. योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उक्त नमूद केलेल्या योजना पथ विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, समाज विकास विभाग, नागपूर महानगरपालिका अंतर्गत दि. 04/10/2021 ते 12/10/2021 सकाळी 11:00 ते सायंकाळी 04:00 वा. पर्यंत या कालावधीत स्व. पंडित रविशंकर शुक्ला हायस्कूल, टेम्पल बाजार रोड, सिताबर्डी, नागपूर येथे 9 दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिराकरिता पथ विक्रेत्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, पासपोर्ट फोटो, इलेक्ट्रिक बिल, जातीचे प्रमाणपत्र (SC/ST असल्यास) कागदपत्रासह जास्तीत जास्त संख्येत पथ विक्रेत्यांनी शिबिराचा लाभ घेण्याबाबत,तसेच ज्या पथ विक्रेत्यांना रू. १०,०००/- केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (PM SVANidhi) अंतर्गत बँकेमार्फत भांडवल प्राप्त झाले आहे, परंतु ज्यांचे स्वनिधी ते समृद्धी योजने अंतर्गत सर्व्हेक्षण झाले नाही, अश्या पथ विक्रेत्यांनी सुद्धा शिबिराचा लाभ घेण्याबाबत उपायुक्त (समाज विकास विभाग), महानगरपालिका, नागपूर यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here