अल्पवयीन मुली वर बलात्कार, दोन आरोपी विरुद गुन्हा दाखल 

0
12

कोंढाळी दि 2 अक्टूबर( वार्ताहार)

येथील पोलीस ठाण्यांत एक 17 वर्षिय अल्पवयीन मुली वर अत्याचार करणाऱ्यां दोन आरोपी विरूद कोंढाळी पोलीसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळ वर्धा जिल्ह्यातील खरागंना पोलीस ठाण्यां अंतर्गत येत असल्याने प्रकरण खरागना पोलीसा कडे पाठवीले.

कोंढाळी पोलीस ठाण्यां अंतर्गत वाई येथील एका महिलेने आपल्या 17 वर्षिय मुलीसह कोंढाळी पोलीस ठाण्यांत दिनांक 1अक्टोबर ला येवून तक्रार केली की तीने आपल्या 17 वर्षिय मुलीला बोथली ता.आर्वी जिल्हा वर्धा येथे नव्हेबर 20 मध्ये आपल्या माहेरी आजोबा कडे ठेवले होते. तेथे मुलील्या मामीच्या भाऊ केवल दरबार गुंदी 27 रा.अकोली तालुका सेलु जिल्हा वर्धा यांने आपली बहिन व मुलीची मामी रुकसाना किरण राठोड 30रा.बोथली जिल्हा वर्धा हिच्या मदतीने मुलीला फूस लावून मिरा रोड वसई जिल्हा ठाणे येथे पळवून नेले व तेथे तिच्या वर अत्याचार केले त्यामुळे मुलगी 8 महिण्यांची गर्भवती झाली.

कोंढाळी चे ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी तातडीने कोंढाळी पोलीस ठाण्यांत आरोपी केवल दरबार गुंदी 27 अकोली ता.सेलु जि.वर्धा व त्यांची बहिन रूकसाना किरण राठोड 30 रा.बोथली ता.आर्वी जि.वर्धा यांच्या विरुद अत्याचार व पोस्को विरुद गुन्हा दाखल करुन हे.कॉ.भोजराज तांदूळकर यांनी घटनास्थळ वर्धा जिल्ह्या अंतर्गत येत असल्याने तपास खरांगना पोलीसां कडे दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here