वाशीम दि 2 ऑक्टोबर ( दिपक भारूका)
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली तसेच सरकारवर विदर्भविरोधी आणि मराठवाडाविरोधी होण्याचा आरोपही त्यांनी या वेळी लावला
वाशीम जिल्ह्यात गत आठ दिवसांपेक्षाही अधिक काळापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ चालविला होता. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणच्या शेतातील शेंगा काळ्या झाल्या, त्यांना बुरशी लागली, कोंब फुटले आहेत.
शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावल्या गेला आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. अतिवृष्ट्रीने झालेल्या या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी मायभूमी न्यूजशी बोलताना सांगितले





