वाशीम जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधित नाही

0
7

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित होणार्‍या व्यक्तीचा आलेख खालावत असून, 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकाही कोरोना बाधितांची नोंद झाली नाही. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना बाधित व्यक्तीचे प्रमाण घटत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष भर दिला.

जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 41,747 झाली तर 41,100 रुग्ण उपचाराने बरे झाले असून, 638 जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 8 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची दूसरी लाट ओसरत असली तरी तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here