महाराष्ट्र शासनाने गरीब आणि गरजू लोकांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी अत्यंत अल्प दरात शिव भजन थाळी सुरू केली होती त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत होता, अचानक करुणा च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आणि सरकारने शिव भोजन थाळी पाच रुपये आणि नंतर मोफत केली
आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात आल्याने राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली असून या अंतर्गत शाळा, मंदिर ,धार्मिक स्थळ आणि थियेटरला उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे , आता सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला आहे. 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी पुन्हा 10 रुपयांना मिळणार आहे.
कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत होते. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात होती. 30 सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल नंतर त्याचे दर 10 रुपये असे पूर्वीप्रमाणे करण्याचा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे. तसेच पार्सल सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.






