पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर

0
9

🔹 *नागपुरात प्रकृती असवस्थेनंतर अँजियोप्लास्टीद्वारे यशस्वी शस्त्रक्रीया*

लॉंगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि कवाडे सर यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी मंगळवारी  दिली आहे.

शनिवारी प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रा.कवाडे यांना रामदासपेठ येथील अरनेजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. विविध तपासण्याअंती मिळालेल्या निष्कर्षानंतर ह्रदयातील ब्लॉकेजेसमुळे प्रा.कवाडे यांच्यावर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. जसपाल अरनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक विशेष टीम प्रा.कवाडे यांच्या उपचार करीत आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रा.कवाडे यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत. लवकरच ते संघटना कार्यात नव्या ऊर्जेने रूजू होती, अशी माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here