शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त प्रशांत पवार यांनी ८१ किलोचा कापला केक

0
9

नागपूर,ता.१३ डिसेंबर:(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नेते नसून वादळ आहेत,केवळ महाराष्ट्रसाठी नाही तर अवघ्या देशासाठी त्यांचे व्यक्तिमत्व हे वादळासारखे आहे.या ही वयात म्हणजे वयाच्या ८१ सा व्या वर्षी त्यांच्यातील स्फूर्ती वाखाण्यासारखी असून ,आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरते,असे विधान राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बजाज नगर येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात ८१ किलो चा केक कापण्यात आला.याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.शरद पवार यांनी जो सत्ता खेचून आणण्याचा प्रयोग महाराष्ट्रात २०१९ मध्ये राबवला तोच प्रयोग ते देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणूकीनंतर घडवून आणतील असा आम्हाला ठाम विश्‍वास आहे,असे ते म्हणाले.

शरद पवार हे असे नेते आहेत ज्यांना शेतकरी,मजूर,कष्टकरी,सामान्य माणूस यांची जाण आहे.त्यांच्या शरीरात अशी कोणती प्रथिने आहेत जी त्यांना एवढी उर्जा देते,हे जगातील कोणतेही डॉक्टर किवा भारतातील जनता ही ओळखू शकत नाही.न थकता न थांबता ते ज्या पद्धतीने राजकीय पटलावर वावरतात ते थक्क करणारे आहे.त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी आदर्श असल्याचे पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी शरद पवार यांचा वाढदिवस ८१ किलोचा केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पवार यांच्या संपूर्ण जीवनप्रवासावर‘ मधुबन शाहीर कलाकार मंडळा’तर्फे पोवाडा सादर करण्यात आला.‘आज सोहळा आनंदाचा, जन्म दिन शरद पवारांचा‘या पोवाड्याने कार्यक्रमात रंगत आणली.

कलावंतांनी शरद पवार यांचे जीवनचरित्र आपल्या पोवाड्यात मांडले.शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० चा.त्यांच्या जन्मापासून तर आजपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास गायकांनी सुरात गूंफला.यावेळी त्यांनी राष्ट्रीय पोवाडा ही सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

ढोलकवर गुलबाराव मसराम,मंजिरीवर खेमचंद सहारे,बेंजोवर मयुर मसराम,तर सूर वादनावर आनंदराव अंबाडकर यांनी साथसंगत केली.शरद माताघरे व वसंत माताघरे यांनी पाेवाडा सादर केला.त्यांना दादाराव हटवार,सुनील घोंगडी व आयुष वाकुडीकर यांनी गायनात साथ दिली.

राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्‍वरराव बाळबुधे,अल्पसंख्याक सेलचे जावेद हबीब,उपाध्यक्ष रविंद्र इटकेलवार,शहर उपाध्यक्ष मिलिंद महादेवकर,संजय जोशी,अलका कांबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here