विधान परिषद चुनाव :उद्या मतमोजणी , पोलिसांचा कडक बंदोबस्त

0
10

नागपुर दिनांक 13 डिसेंबर (महानगर प्रतिनिधी)

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी 10 डिसेंबरला  (Vidhan Parishad Election 2021)  मतदान झाले होते , या जागांचा निकाल 14 डिसेंबरला जाहीर होईल. या सहा जागांमध्ये नागपूर मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, या जागांचा समावेश आहे.

उद्या 14 डिसेंबर ला नागपूर विधान परिषदेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार असून आज दुपारपासूनच मतमोजणी केंद्रावर बॅरिकेट्स लावून पोलीस सज्ज झाले असून पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून येत आहे

या निवडणुकीत भाजपातर्फे चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसने आपला उमेदवार बदलत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थनाची घोषणा केली होती, उद्याच्या निकालाकडे नागपूर वासियांचे लक्ष लागले असून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here