राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर देशमुख कुटुंबीयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. ही मालमत्ता परत करावी ही मागणी करणारी याचिका देशमुख कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
ईडीने अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे तर ऋषिकेश देशमुखने अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज केला आहे.
ईडीने जप्त केलेला फ्लॅट आणि जमिन कुटुंबीयांच्या मालकीचे
सुरुवातील सुरुवातीला ईडीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्याचप्रमाणे मालमत्ता जप्त केली आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांची पनवेल येथे प्रस्तावित विमानतळा शेजारी जमीन होती. ही जमीन ईडीने जप्त केली आहे. तसेच वरळी येथील फ्लॅटही जप्त केला आहे. ही जमीन आणि फ्लॅट ही मालमत्ता अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांच्या मालकीची नसून ती त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या मालकीचे आहे. या पार्श्वभूमीवर ही मालमत्ता परत करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.






