क्रिम्स हॉस्पिटल विरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात FIR

0
15

नागपुर दिनांक 4 दिसंबर (प्रतिनिधि)

नागपूर महानगरपालिकाच्या उद्यान विभागाद्वारे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपाच्या परवानगीविना गुलमोहर, बादाम आणि कडूलिंबाच्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या प्रकरणी रामदासपेठ येथील क्रिम्स हॉस्पिटल (KRIMS Hospital) विरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात FIR नोंदविण्यात आली आहे.

शनिवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी मनपा आयुक्तांना सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे व उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांना हॉस्पिटल परिसरातील झाडांची पाहणी करण्याचे निर्देश दिले. पाहणीनंतर उद्यान निरीक्षक अनंत नागमोते यांनी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here