नागपूर दिनांक 19 नवंबर (प्रतिनिधि)
12 ते 14 या नोंव्हेबर दरम्यान दिल्लीच्या द्वारका येथे पार पडलेल्या भारतातील पहिल्या “मिक्स मार्शल आर्ट सुपर फाईट ” स्पर्धेत नागपूरच्या कार्तिकने कांस्यपदक पटकाविले. आणि या स्पर्धेमध्ये भारतासह इतर देशातून आणि अफगाणिस्थान येथून संपूर्ण देशातील 200 फायटर सहभागी झाले होते.
या स्पर्धेतील कार्तिकने उत्तम प्रकारे कामगिरी केली. त्यांनी दिल्लीच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्यांची बेंगलोर येथे 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या चॅम्पियनशीप स्पर्धेकरिता कार्तिक जैस्वाल पात्र ठरलेला आहे.
एमएमए फायटर कार्तिक जैस्वाल हा मोहता कॉलेज ऑफ सायन्समध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. रवि मेंढे सरांकडे इन्सपायर जिम मध्ये सध्या सराव करतो आहे.






