नागपूर : दि. 18 नोव्हेंबर (प्रतिनिधि)
महाराष्ट्र गर्व्हमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनच्या सर्वेसर्वा प्रभाताई भजन, सरचिटणीस यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांच्या मूळ गावी दुःखद निधन झाले.
प्रभाताई भजन हया ऑल इंडिया गर्व्हंर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या कार्याध्यक्षा आणि राज्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पण कार्याध्यक्षा होत्या. तसेच जे.पी.ए. च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमंत्रक होत्या. त्यांच्या निधनामुळे कर्मचारी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असून त्या परिचारिकांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिचारिकांचे आधारवड कायम स्वरूपी ११ नोव्हेंबर लाच काळाच्या पडद्याआड गेल्या.
दि.12 नोव्हेंबर 21 रोजी झालेल्या शोकसभेत महाराष्ट्र गर्व्हंमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनच्या कल्पना विंचूरकर यांच्या अध्यक्षतेत शोकसभेत वर्षा पागोटे, यशोदा मून, सुनंदा महंत, तनुजा वाटकर, शारदा भुते व अनुप भोयर तसेच असंख्य परिचारिकांचा समूह तसेच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्याध्यक्ष मुकुंद पालटकर यावेळी सहभागी होते





