मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी

0
9

मानदुखीचा त्रास वाढल्याने रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली होती. तर, तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, डॉक्टरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी सायंकाळी रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. मात्र गुरुवारी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल गुरुवारी सायंकाळी आले. त्यावरून वरिष्ठ डॉक्टर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला होता. त्यानुसार गुरुवारी चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली. या चर्चेत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

शस्त्रक्रियेनंतर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्र्यांवर फिजिओथेरपी सुरू होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here