अन्यथा पिरीपा एमआयएम सोबत गठबंधन करेल:कवाडे

0
11

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनी 14 ऑक्टोम्बर ला दुपारी 1 वाजता रहाटे कॉलोनी वर्धा रोड येथील लक्ष्मीमंगल कार्यालयात 41 व्या भीमसैनिक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असल्या ची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

 

या कार्यक्रमाला विविध राज्यातून पिरिपाच्या प्रदेशाध्यक्ष यांची उपस्थिती राहणार आहे .प्रमुख पाहुणे म्हणून पिरिपा दिल्ली चे प्रदेशाध्यक्ष अशोक वानखेडे, गुजरात चे प्रदेशाध्यक्ष सुरेशभाई सोनवणे, मध्यप्रदेश चे पी के गजभिये, कर्नाटक चे प्रकाश मुलभारती यांच्यासह आदी राज्यातील प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर हे येणाऱ्या महानगरपालिका आणि त्यानंतर येणाऱ्या निवडणूकी संदर्भात आपली राजकीय रणनिती आखणार आहेत . तसेच नागपूरात सुद्धा महापालिका निवडणुकीत किती उमेदवार उभे करायचे यावर सुद्धा चर्चा होणार आहे अशी माहिती  राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी दिली

जयदीप पुढे म्हणाले आम्ही 21 वर्षापासून काँग्रेस सोबत आहोत पण सत्तेत भागीदारी द्यायची वेळ आली तर आमचा विचार केला जात नाही आमचा विचार केला गेला नाही तर एम आय एम सोबत गठबंधन करण्याची मानसिकता ही त्यांनी यावेळी बोलून दाखवले आणि जोगेंद्र कवाडे आणि ओवेसी यांची भेट झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

पत्रपरिषदेला पिरिपाचे नागपूर शहर अध्यक्ष अरुण गजभिये यांचे सह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here