धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेससाठी ‘आपली बस’ची विशेष व्यवस्था

0
10

नागपूर, ता. ११ : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस कामठीकरीता आपली बसची संख्या वाढविण्यात आली आहे. १३ ते १६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान बौद्ध अनुयायांच्या सोयीकरिता ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी बौद्ध अनुयायांना दीक्षाभूमी किंवा कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मनपाच्या परिवहन विभागातर्फे शहर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमी किंवा ड्रॅगन पॅलेस कामठी येथे जाण्याकरिता शहर बस मध्येच प्रवास करावा, असे आवाहन मनपाच्या परिवहन विभागातर्फे करण्यात येत आहे.

 

या मार्गावरून जाणार बसेस

– दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस व परत

– दीक्षाभूमी ते अंबाझरी टी पॉईंट व परत

– कपिल नगर ते दीक्षाभूमी व परत

– नारा ते दीक्षाभूमी व परत

– नागसेनवन ते दीक्षाभूमी व परत

– यशोधरानगर ते दीक्षाभूमी व परत

– आंबेडकर पुतळा ते दीक्षाभूमी व परत

– रामेश्वरी ते दीक्षाभूमी व परत

– भीमचौक ते दीक्षाभूमी व परत

– वैशाली नगर ते दीक्षाभूमी व परत

– राणी दुर्गावती नगर ते दीक्षाभूमी व परत

– गरोबा नगर ते दीक्षाभूमी व परत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here