जॉन्सन पेडर या रोका ग्रुपच्या आश्रयांतर्गत असलेल्या ब्रॅण्डने आज त्यांचा नवीन विभाग प्लास्टिकचे संक्षिप्त स्वरूप असलेला पीटीएमटी सादर केला. यामध्ये सिन्थेटिक व मेटल्सचे सर्वोत्तम गुणधर्म सामावलेले आहेत. यामधून उत्तम उपयोजन व टिकाऊपणाची खात्री मिळते आणि ते उत्पादनांच्या टिकाऊपणाला साह्य करते. ब्रॅण्ड भारतातील पीटीएमटी बाथरूम फिटिंग्ज बाजारपेठेत प्रवेश करत असताना जॉन्सन पेडरने दोन नवीन फॉसेट श्रेणी ‘कूल’ व ‘डिलाइट’ लाँच केल्या. प्रत्येक श्रेणीमधील १२ एसकेयू फॉसेट्सच्या सर्व गरजांची पूर्तता करतात.
कार्यक्षमता व स्टाइलचे परिपूर्ण संयोजन असलेले लीक-फ्री, किफायतशीर व टिकाऊ फॉसेट्स कणखर साहित्यापासून बनवण्यात आले आहेत. हे साहित्य भेगा व डाग पडणे अशा घटकांपासून संरक्षण करतात आणि अॅण्टीस्टॅटिक आहेत. ज्यामधून फॉसेट्सवर धूळ न राहण्याची खात्री मिळते. ‘कूल व डिलाइट’ श्रेणीच्या अद्वितीय कार्यक्षमतेला जोड म्हणून जॉन्सन पेडर बाथरूम फिटिंग्ज देखील सादर करत आहे, ज्यामध्ये कनेक्शन होस, वेस्ट कपलिंग, बोटल ट्रॅप, हेल्थ फॉसेट व वेस्ट पाइपचा समावेश आहे.
या लाँचबाबत बोलताना जॉन्सन पेडरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. के. ई. रंगनाथन म्हणाले, ”भारतातील पीटीएमटी बाथरूम फिटिंग्ज बाजारपेठ झपाट्याने विकसित होत आहे आणि भविष्यात अधिक प्रगती करण्याची अपेक्षा आहे. जॉन्सन पेडरमध्ये आमच्या सर्व उत्पादनांच्या आमच्या लॅबमध्ये प्रखर चाचण्या केल्या जातात, ज्यामधून त्यांच्या कार्यक्षमतेची खात्री मिळते. विभाग प्रिमिअम दर्जाचे, तसेच किफायतशीर उत्पादने देतो, ज्यामधून कोणत्याही बाथरूमसाठी कूल व डिलाइट फॉसेट श्रेणीमधून पैशांचे मोल मिळण्याची खात्री मिळते. या लाँचसह जॉन्सन पेडरचा एण्ट्री-लेव्हल विभागामधील किफातयशीर दरामध्ये उच्च दर्जाचे बाथरूम उत्पादने असण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा मनसुबा आहे.”
जॉन्सन पेडरची कूल व डिलाइट फॉसेट श्रेणी उच्च कार्यक्षमतेसाठी उत्तमरित्या डिझाइन करण्यात आली आहे, जी लीक-फ्री, टिकाऊ व किफायतशीर आहे. ही श्रेणी निवडक उत्पादनांसाठी ३ वर्षांची वॉरंटी व आयएसआय प्रमाणन देते. जॉन्सन पेडरची उत्पादने उद्योगक्षेत्रामधील सर्वोत्तम दर्जाच्या तपासण्यांमधून जातात आणि उद्योगक्षेत्राच्या मानक मार्गदर्शकतत्त्वांनुसार उत्पादित केली जातात. ज्यामुळे ही उत्पादने टिकाऊ असण्यासोबत ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करत त्यांचे समाधान करण्याची खात्री देतात.
‘कूल व डिलाइट’ श्रेणीमधील उत्पादने भारतभरात उपलब्ध आहेत.






