महात्मा गांधी जयंती निमित्त शहरातील कत्तलखाने बंद 

0
20

नागपूर दिनांक 28 सितंबर ( महानगर प्रतिनिधी)

“महात्मा गांधी जयंती” दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन च्या निर्देशानुसार रविवार दिनांक 02 ऑक्टोंबर, 2022 ला “महात्मा गांधी जयंती” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.

या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here