आमदार डॉ. परिणय फुके यांच्या लहान भावाचे निधन

0
16

नागपूर दिनांक 9 सप्टेंबर ( महानगर प्रतिनिधी )

नागपुरातील तरुण व्यावसायिक संकेत रमेश फुके यांचे अल्पशः आजाराने शुक्रवारी दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मुंबई येथे निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते.

आमदार डॉ. परिणय फुके यांचे ते धाकटे बंधू होत. दिवंगत संकेत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील, दोन भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

दिवंगत संकेत फुके यांचे अंत्यदर्शन शनिवारी, सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत राहते घरी “समीर”, प्लॉट क्र. १३, अंबाझरी हिलटॉप, नागपूर येथे व अंत्यसंस्कार दुपारी २ वाजता अंबाझरी दहनघाट येथे करण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here