योडलिंग क्‍वीन’ शन्‍मुख प्रियाचा ‘रॉकिंग परफॉर्मन्‍स’

0
20

नागपूर दिनांक 4 सितंबर ( शहर प्रतिनिधी)

योडलिंग क्‍वीन म्‍हणून ओळखली जाणारी युवा रॉकस्‍टार शन्‍मुख प्रियाने आपल्‍या सुमधूर आवाजाने आणि रॉकिंग परफॉर्मन्‍सने रसिकांची मने जिंकली. गायत्रीनगर परिसरातील नागरिकांनी शन्‍मुख प्रियाच्‍या सुरात सूर म‍िसळून गाण्‍यांवर ताल धरला.

विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने ‘व्‍हीआयपीएलचा राजा’ गणेशोत्‍सवांतर्गत शन‍िवारी गायत्रीनगर येथील व्हीआयपीएल आयटी पार्कच्या आवारात इंडियन आयडॉल फेम रॉकस्‍टार शन्‍मुख प्रिया यांची ‘लाईव्‍ह कॉन्‍सर्ट’ आयोजित करण्‍यात आली होती. तत्‍पूर्वी, एनआयटीचे चेअरमन मनोज सूर्यवंशी व श्रीमती सूर्यवंशी यांनी ‘व्‍हीआयपीएलचा राजा’ ला भेट दिली व श्रीगणेशाची आरती केली. यावेळी व्‍हीआयपीएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक प्रशांत उगेमुगे यांची प्रमुख उपस्‍थि‍ती हेाती.

‘देवा श्रीगणेशा’ या गीताने शन्‍मुख प्रियाने श्रीगणेशाला वंदन करीत आपल्‍या सादरीकरणाला सुरुवात केली. त्‍यानंतर तिने ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले अतिशय लोकप्र‍िय गीत ‘दिल से रे’ सादर करीत रसिकांच्‍या मनाची पकड घेतली. ‘रुप तेरा मस्‍ताना’ हे गीत शन्‍मुख प्रियाने खास आपल्‍या रॉकिंग अंदाजात सादर करीत उपस्थितांना थिरकायला लावले.

‘उर्वशी उर्वशी’ या गीतानंतर ‘मैं झूम झूम झुमरू’ प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे यॉडलिंग गीत आपल्‍या खास शैलीत सादर करून शन्‍मुखने ती ख-या अर्थाने ‘यॉडलिंग क्‍वीन’ सिद्ध केले. तिच्‍या या गीताला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाटात भरपूर दाद दिली. कार्यक्रम उत्‍तरोत्‍तर रंगत गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे फरहानने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here