नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. राधाकृष्ण बी यांनी जनतेकडून कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, असं काँग्रेसने म्हटलंय. तसेच नागरिकांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीदेखील नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली. पोलीस आयुक्तांकडे त्यांनी ही मागणी केलीय.
फसवणुकीने कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले
मागील अनेक दिवसांपासून नागपूरमधील राजकारण तापले आहे. नागपूर मनपा तर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या नागपूरचे मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्यावर नागपूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी मागील अनेक दिवसांपासून जनतेकडून फसवणुकीने कर स्वरुपात कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, असा आरोप विकास ठाकरे यांनी केलाय. तसेच जनतेकडून वसूल केलेले हजारो कोटी रुपये परत करावेत अशी मागणीदेखील ठाकरे यांनी केली आहे.
कारवाई करण्याची नागपूर काँग्रेसची मागणी
याच मुद्द्याला घेऊन विकास ठाकरे यांनी पोलीस आयुक्त तसेच राज्य सरकारकडे राधाकृष्ण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या या आरोपानंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






