नागपूरात ७५ टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोज , धरमपेठ झोनमध्ये सर्वाधिक लसीकरण

0
11

नागपूर, ता. १६ : जानेवारी महिन्यात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर नागपूर शहरातील एकूण २८,७६,६६५ नागरिकांपैकी १८ वर्षापुढील १७,५४,७६६ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अर्थात लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या ६१ टक्के होती. त्यापैकी १८ ते ४५ वर्ष वयोगटातील ४०.०७ टक्के, ४५ ते ६० वर्ष वयोगटातील १२.५ टक्के तर ६० वर्षांवरील ८.५ टक्के नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. यापैकी एकूण ७५ टक्के नागरिकांचा (१३२५८२५) पहिला डोज तर ३१ टक्के नागरिकांचा (५५३९८३) दुसरा डोज पूर्ण झाला आहे. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना लवकरात-लवकर दोन्ही डोज घेण्याचे आवाहन केले आहे.

लसीकरणाच्या आकडेवारीच्या झोननिहाय अहवालानुसार, सर्वाधिक लसीकरण धरमपेठ झोनमध्ये तर सर्वात कमी सतरंजीपुरा झोनमध्ये झाले आहे. धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरातील १९५४५४ नागरिकांनी पहिला तर ९५७१२ नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरामधील ५२९७७ नागरिकांनी पहिला तर २०८७६ नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. मनपा तर्फे निराधार, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर, कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसलेले नागरिक, परदेशात शिक्षणासाठी व नौकरीसाठी जाणा-या नागरिकांचे व स्लम वस्यांसरमध्ये राहणा-या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या अहवालानुसार, लसीकरणासाठी असलेल्या ६१ टक्के पात्र नागरिकांच्या उद्दिष्टांपैकी १८ ते ४५ वयोगटातील पात्र ४०.०७ टक्के नागरिकांपैकी ६४ टक्के (७४३८१७) नागरिकांचा पहिला डोज तर १५ टक्के (१७९३५६) नागरिकांचा दुसरा डोज झाला आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगटातील कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या १२.५ टक्के असून त्यापैकी ९८ टक्के (३५३९७२) नागरिकांचा पहिला डोज तर २२ ट्के (७८१६९) नागरिकांचा दुसरा डोज पूर्ण झाला आहे. ६० वर्षांवरील पात्र ८.५ टक्के नागरिकांपैकी ९३ टक्के (२२८०३६) नागरिकांचा पहिला डोज तर ८७ टक्के (२१४८९९) नागरिकांचा दुसरा डोज पूर्ण झाला आहे.

लसीकरणासाठी गर्दी होऊ नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे या हेतूने नागपूर शहरात झोननिहाय केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. एकूण १६२ शासकीय लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. त्यापैकी लक्ष्मीनगर झोनमध्ये २०, धरमपेठ झोनमध्ये १७, हनुमान नगर झोनमध्ये १८, धंतोली झोनमध्ये १९, नेहरूनगर झोनमध्ये १६, गांधीबाग झोनमध्ये १३, सतरंजीपुरा झोनमध्ये सात, लकडगंज झोनमध्ये १६, आशीनगर झोनमध्ये १६ तर मंगळवारी झोनमध्ये १७ शासकीय केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

 

झोननिहाय लसीकरण (पहिला व दुसरा डोज)

झोनचे नाव व क्रमांक पहिला डोज दुसरा डोज एकूण

लक्ष्मीनगर झोन क्र. १ १५३९६६ ८२६२२ २३६५८८

धरमपेठ झोन क्र. २ १९५४५४ ९५७१२ २९११६६

हनुमान नगर झोन क्र. ३ ११७७०३ ५२३५३ १७००५६

धंतोली झोन क्र. ४ १४७८२३ ९०६६३ २३८४८६

नेहरू नगर झोन क्र. ५ ११६९३३ ४६४७१ १६३४०४

गांधीबाग झोन क्र. ६ ११०४६५ ६९१४६ १७९६११

सतरंजीपुरा झोन क्र. ७ ५२९७७ २०८७६ ७३८५३

लकडगंज झोन क्र. ८ १२५१३३ ३२८४५ १५७९७८

आशीनगर झोन क्र. ९ ९४६४६ ३५७१५ १३०३६१

मंगळवारी झोन क्र. १० १५२४५१ ६९९९७ २२२४४८

सर्व झोन एकूण १२६७५५१ ५९६४०० १८६३९५१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here