ओबीसी आरक्षण वर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना ओबीसी आरक्षण न मिळाल्यास भाजपात जबाबदार असल्याचे सांगत राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुन्हा अपील करावी असा काँग्रेसचे धोरण असल्याचे स्पष्ट केले
भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारने ओबीसी आरक्षण मध्ये दिरंगाई केल्याने ओबीसी आरक्षण न मिळाल्यास मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा दिला होता त्यावर नाना पटोले यांनी आरक्षण ना मिळण्यास फडणवीस सरकार जबाबदार असून तेच आता मंत्र्यांना गावात फिरून देण्याची भाषा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला






